भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार

भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

PTI | Updated: Sep 26, 2015, 05:13 PM IST
भाजपची पैसे घेऊन उमेदवारी : भाजप खासदार title=

नवी दिल्ली : भाजपमध्ये गुन्हेगारांना पैसे घेऊन उमेदवारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार आर. के. सिंग यांनी केलाय. त्यामुळे भाजपमध्ये पैशाचा बाजार होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आल्याची चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली आहे. ही उमेदवारी गुन्हेगारी स्वरुपाच्या नेत्यांना देण्यात आली आहे. भाजपने पैसे घेऊन अशा उमेदवारांना तिकीट दिल्यास, लालूप्रसाद आणि भाजपमध्ये फरक काय आहे, असे आर. के. सिंग म्हणालेत.

 भाजपमधील काम करणाऱ्या आमदारांना उमेदवारी नाकारून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी फोनला काहीही प्रतिसाद देत नाहीत, असा थेट आरोप सिंग यांनी केलाय.

बिहारमध्ये पुढील महिन्यापासून पाच टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप विरुद्ध महाआघाडी असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीत असताना आता भाजप खासदारानेच पक्षाला घरचा आहेर दिल्याने बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.