मोदींच्या वाराणसीत भाजपचा दारूण पराभव

वाराणसी मतदार संघात भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत वाराणसीत अभूतपूर्व विजय प्राप्त केला होता. 

Updated: Jan 8, 2016, 05:49 PM IST
मोदींच्या वाराणसीत भाजपचा दारूण पराभव title=

वाराणसी : वाराणसी मतदार संघात भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत वाराणसीत अभूतपूर्व विजय प्राप्त केला होता. 

उत्तरप्रदेशातील जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी समाजवादी पक्षाने भाजपला पराभवाचा धक्का दिला. एकूण ७४ जागांपैकी तब्बल ६० जागांवर समाजवादी पक्षाने एकहाती विजय प्राप्त केला आहे. 

जिल्हा पंचायतीचे हे निकाल भाजपसाठी आव्हान देणारे आहेत, त्यामुळे भाजप आता यापुढे यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाच असणार आहे. 

राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या मेरठमध्येही समाजवादी पक्षाचा उमदेवार विजयी झाला आहे. याशिवाय, वाराणसीत जिल्हा पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या अपराजिता सोनकर यांनी भाजप उमेदवार अमित सोनकर यांचा १३ मतांनी पराभव केला.