मुरादाबाद : मुरादाबाद जेलच्या महिला बॅरकच्या उंबरड्यावर मानवाधिकार अखेरचा श्वास घेतात. जेलच्या मॅन्युअल आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यांची मोठी लिस्ट असेल पण येथे जेल प्रशासनाच्या तोंडून निघालेला शब्द हा कायदा असतो. या बॅरकची परिस्थिती अशी आहे की कशाला नरक म्हणतात हे आपल्या समजले.
जेलमधील एक बॅरक २७ महिला कैद्यांसाठी बनविण्यात आली आहे. यात २०० महिला आपल्या मुलांसोबत राहतात. झोपण काय बसणंही यात अशक्य आहे. जिल्ह्यातील जेलमध्ये ही एकमेव महिला बॅरक असल्याने जागा असो या नसो पण त्यांना राहावे या ठिकाणी लागते. संध्याकाळ झाल्यावर महिला कैद्यांना या बॅरकमध्ये कोंबले जाते. जनावरांपेक्षाही भयानक हाल या महिला कैदीचे होतात. ज्या बॅरकमध्ये श्वास घेणे अवघड आहे अशा ठिकाणी २८ लहान मुलंही कैदेत आहेत.
चार महिने असा बॅरकमध्ये कसे तरी जगल्यानंतर सुटून आलेल्या भाजप महिला मोर्चाच्या महानगर अध्यक्ष मदालसा शर्मा यांनी येथील परिस्थिती सांगितली. त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आलं.
भाजपच्या या महिला सदस्याला जेल प्रशासनाबद्दल काही तक्रार नाही, पण तेथील परिस्थिती सांगताना त्यांना अक्षरक्षः रडू कोसळले. एकटी असेल तरी ठीक आहे पण ज्या महिला कैद्याचे मूलं या ठिकाणी आहे त्यांचे सर्वाधिक हाल होतात. या बॅरकमध्ये २८ मुलं आहेत त्यांना घेऊन महिला रात्रभर उभ्या असतात. त्या सर्व सकाळ होण्याची वाट पाहतात की सूर्य कधी निघेल आणि त्या बॅरकमधून बाहेर पडलीत आणि खाली बसतील.
बॅरक तर सोडा बॅरकला लागू असलेल्या दुर्गंधी असलेल्या टॉयलेटपर्यंत महिला उभ्या राहून रात्र काढतात. संध्याकाळ झाल्यावर बॅरकमध्ये जाण्याचा नावानेच त्यांची गाळण उडते. बॅरकमध्ये अशा काही महिला कैदी आहेत की त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही आहे. घालायला कपडे नाही, मानिसक हालत खराब असल्याने त्या निर्वस्त्रच फिरतात.
कैद्यांना खायला वेळेवर दिले जाते पण कपडे आणि आवश्यक वस्तूंची मिळण्याची आशा करणे चुकीचे ठरते. ज्यांना हॉस्पिटलमध्ये असले पाहिजे. ते बॅरकमध्ये कैद आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.