भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

Updated: Aug 9, 2014, 12:12 PM IST
भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब title=

नवी दिल्ली : भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

या बैठकीसाठी देशभरातून पार्टीचे प्रमुख नेते उपस्थित राहिलेत. या बैठकीचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणानं करणार आहेत. त्यावेळी एनडीए सरकारची कामगिरी आणि येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका यामुळे भाजपच्या या एक दिवसीय परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 

एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारची कामगिरी, मोदी सरकारचे निर्णय यावर प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची पहिली परीक्षा असणार आहे. या राज्यातसुद्धा एनडीएचं सरकार यावं याची रणनिती ठरवण्यासाठी राष्ट्रीय परिषदेत मंथन होणार आहे. 

याच परिषदेत अमित शहा यांच्या नव्या टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या टीममध्ये अनेक नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा रंगलीय. या नव्या दमाच्या टीमवर विविध राज्यांची जबाबदारी सोपवण्यात येईल. एक दिवस चालणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भाषणं होणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही या परिषदेत नेत्यांना मार्गदर्शन करतील.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.