वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे संसदेत गैरहजर – सचिन

संसदेतील गैरहजेरीबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या विषयावर सचिननं स्पष्टीकरण दिलंय. 

Updated: Aug 9, 2014, 09:42 AM IST
वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे संसदेत गैरहजर – सचिन title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : संसदेतील गैरहजेरीबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या विषयावर सचिननं स्पष्टीकरण दिलंय. 

‘मोठा भाऊ अजित याची बायपास सर्जरी झाल्यामुळे त्याच्यासोबत राहणं आवश्यक होतं... त्यामुळेच आपण राज्यसभेमध्ये हजर राहिलो नाही... राज्यसभा किंवा अन्य कुठल्याही आस्थापनेचा अपमान करण्याचा आपला हेतू नाही’ असं स्पष्टिकरण सचिननं दिलंय. 

यावेळी, माझ्या गैरहजेरीवर गरजेपेक्षा जास्तच चर्चा होत असल्याचंही सचिननं म्हटलंय. याबद्दल त्यानं व्यक्त केलेली नाराजी स्पष्ट होती. 

महत्त्वाचं म्हणजे, पुढील वीस दिवसांच्या कामकाजात हे दोघे सहभागी न झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. सचिन सलग चाळीस दिवस अनुपस्थित आहे आणि नियमानुसार, सलग साठ दिवस दांडी असेल तर खासदारकीच रद्द होते. संसदेच्या रेकॉर्डसनुसार सचिन यावर्षभरात एकदाही संसदेत आलेला नाही. तसंच 2013 मध्येही सचिननं केवळ 3 दिवस सत्रात भाग घेतला होता.

सचिन आणि रेखाच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीवरून गोंधळ उडालाय. दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात सचिननं हे कारण स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.