काळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये

काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.

Updated: Dec 13, 2014, 04:27 PM IST
काळा पैसा :  स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये title=

नवी दिल्ली : काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.

भारता बाहेर पैसे लपवून ठेवणाऱ्या ७९ खातेदारांविरोधात प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केलेय. काळ्या पैशाचा शोध घेणाऱ्या विशेष तपास पथकाने यासंबंधीची निवडक माहिती उघड केली. हे विशेष पथक सध्या देशातील १४ हजार ९५८ कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीचा तपास करत आहेत.

एचएसबीसी बॅंकेच्या जिनिव्हा शाखेने स्विस बॅंकेत पैसे ठेवणाऱ्यांची नावे उघड केली होती. यामध्ये ६२८ भारतीयांचा समावेश आहे. विशेष तपास पथकाने सविस्तर अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला. या अहवालानुसार स्विस बॅंकेतील २८९ खात्यांमध्ये कसलीही रक्‍कम नसल्याचे स्पष्ट झाले. ६२८ पैकी २०१ जण अनिवासी भारतीय असून, काही जणांची ओळख पटलेली नाही.

४२७ जणांपैकी ३३९ खातेधारकांच्या संपत्तीचे धागेदोरे सापडले आहेत. त्यांनी स्विस बँकांमध्ये ४ हजार ४७९ कोटी रुपये दडवले असल्याचे एसआयटीने अहवालात म्हटले आहे. तसेच देशांतर्गत १४ हजार ९५८ कोटी रुपये बेहिशेबी मालमत्तेचा तपास लागला असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी एसआयटीने १३ शिफारसी केल्या असून रोख दहा ते १५ लाख रुपये बाळगणे किंवा त्यांचे हस्तांतरण करण्यावर बंदी आणण्याचे एसआयटीने सुचवले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.