परदेशातील काळ्या पैशाची घोषणा : एकूण ४१४७ कोटी रूपये

परदेशात जमा करण्यात आलेला बेहिशेबी पैशाविरोधात करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार सरकारने देण्यात आलेल्या ९० दिवसांच्या कालावधी अनेकांनी आपले काळा पैसा जाहीर केला आहे. कर अधिकाऱ्याकडे एकूण ४१४७ कोटी रूपयांची माहिती दिली आहे. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रूपये होती. 

Updated: Oct 5, 2015, 05:57 PM IST
परदेशातील काळ्या पैशाची घोषणा : एकूण ४१४७ कोटी रूपये  title=

नवी दिल्ली : परदेशात जमा करण्यात आलेला बेहिशेबी पैशाविरोधात करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार सरकारने देण्यात आलेल्या ९० दिवसांच्या कालावधी अनेकांनी आपले काळा पैसा जाहीर केला आहे. कर अधिकाऱ्याकडे एकूण ४१४७ कोटी रूपयांची माहिती दिली आहे. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रूपये होती. 

महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या अखेरीस एकूण ६३८ प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानुसार परदेशात ४१४७ कोटी रुपयांच्या बेकायदा संपत्तीची घोषणा करण्यात आली. ही अवधी ३० सप्टेंबरपर्यंत होती. सरकारला या सर्वांकडून कर आणि दंड म्हणून एकूण २४८८.२० कोटी रुपये मिळणार आहे. 

यापूर्वी सरकारने एक ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती की अनुपालन सुविधेतंर्गत ३७७० कोटी रूपयांचा काळा पैसा जाहीर करण्यात आला होता. ही प्राथमिक माहिती होती. आता एकूण आकडा ४१४७ कोटी रुपये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.