बोधगया बॉम्बस्फोट : सीसीटीव्ही फुटेज जाहीर

बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 8, 2013, 11:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, गया
बुद्धगयामधील स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. बिहार पोलीसांनी हे फुटेज प्रसिद्ध झालंय. शनिवारी रात्री २ ते ४ वाजल्याच्या सुमारास हे बॉम्ब ठेवण्यात आले, अशी शक्यता आहे. बुद्धगयामध्ये काल पहाटे झालेल्या नऊ साखळी स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले होते. हा स्फोट झाल्यानंतर मंदिरातील भाविकांमध्ये सुरु झालेली पळापळ आपण या फुटेजमधून स्पष्ट दिसतेय.
दरम्यान, बिहार पोलिसांनी गयाचा रहिवासी असलेल्या अन्वर मिस्त्री नामक व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलंय. ‘एनआयए’च्या टीमनं घटनास्थळावर चौकशी सुरू केलीय. पोलीस सीसीटीव्ही फुटेजमधून काही हाती लागतंय का याची चाचपणी करत आहेत. एनआयएच्या चौकशीनंतर आज संध्याकाळी हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्यात येईल.
या बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादि संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नागरिकांत दहशतीचं वातावरण निर्माण करणं, हेच या बॉम्बस्फोटांमागे उद्देश असल्याचंही आता उघड झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन मुजाहिद्दीननं भारतात दहशतवाद्यांच्या झालेल्या अटकेचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट घडवून आणलेत.

बॉम्बस्फोटानंतर तिबेटी अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचं धर्मशाळा परिसरातील निवासस्थान आणि जवळच्या मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दलाई लामा यांना अगोदरच झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.