नवी दिल्ली : परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना २५ हजारापेक्षा कमी किंमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनं लागू केलेत.
याआधी भारतात येणाऱ्या प्रत्येकाला १० हजाराच्या वरच्या वस्तूंची यादी जाहीर कस्टम विभागाला द्यावी लागत असे. आता नव्या नियमानुसार ही रक्कम वाढवण्यात आलीय.
पण भारतीय चलनात २५ हजार किमतीपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिक वस्तूंसाठी वेगळा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यात प्रमुख्यानं एलसीडी आणि एलईडी टीव्हीचा समावेश आहे.
याशिवाय गेली १० वर्ष भारतात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना चीन, नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येताना ४५ हजारापर्यंतच्या वस्तू जाहीर न करता आणता येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.