संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Updated: Jan 22, 2015, 12:48 PM IST
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून  title=

नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

२६ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रुपांतर केले जाणार आहे.

अधिवेशनाचे पहिले सत्र २० मार्च पर्यंत सरु राहणार असून त्यानंतर एक महिन्याच्या सुटीनंतर पुन्हा २० एप्रिल रोजी दुस-या सत्राला सरुवात होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरारावर २४ आणि २५ फेब्रुवारीला चर्चा होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.