केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरु आहे. 

Updated: Jul 5, 2016, 11:53 AM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरु आहे. 

यांची नावे आहेत यादीत 

19 जणांच्या यादीत महाराष्ट्रातून धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे आणि रिपाईचे खासदार रामदास आठवले यांचा समावेश आहे. याशिवाय एम जे अकबर, अर्जुनराम मेघवाल, अनिल माधव दवे, रमेश जीगाजीनांग, पुरुषोत्तम रुपाला, जसवंत सिंह भाभोर, एम एन पांडे, फग्गन कुलस्ते, विजय गोयल आणि अनुप्रिया पटेल यांचीही नावं मंत्रिपरिषदेत येणाऱ्या नव्या मंत्र्यांच्या यादीत आहेत. 

खातेवाटपातही फेरबदल

आजच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपातही मोठे फेरबदल होतील. गेल्या दोन वर्षाच्या काळात ज्या मंत्र्यांनी उत्तम कामगिरी बजावलीय अशा मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यताय. काल दिवसभर मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांची वर्णी लागणार आहे, अशा नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली.