काँग्रेसला दोनच कामे, मोदींना शोधा आणि सोनं शोधा - मोदी

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर वार केलाय. केंद्र सरकारची फक्त माझ्यावरच नजर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सध्या मोदी शोधा आणि सोनं शोधा ही दोनच कामं सरकारकडे असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 15, 2013, 03:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर वार केलाय. केंद्र सरकारची फक्त माझ्यावरच नजर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सध्या मोदी शोधा आणि सोनं शोधा ही दोनच कामं सरकारकडे असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलंय.
छत्तीसगडच्या रायगढमध्ये मोदींची सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर तोंडसुख घेतलं. तसंच देश विकणारा पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत २७२ जागा जिंकण्याचे ध्येय उराशी बाळगलेले गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी नऊ राज्यांच्या दौऱ्याची आखणी केली आहे.

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.