चीटफंड घोटाळ्यात मुंबईच्या मॉडेलला अटक

‘सीबीआय’नं करोडो रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणुकदारांना चुना लावण्याच्या आरोपाखाली मुंबईस्थित एका मॉडेल तसंच धारावाहिक निर्मातीला अटक केलीय. 

Updated: Oct 10, 2014, 02:36 PM IST
चीटफंड घोटाळ्यात मुंबईच्या मॉडेलला अटक title=
उजव्या बाजुला प्रीती तिच्या आईसोबत

भुवनेश्वर : ‘सीबीआय’नं करोडो रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणुकदारांना चुना लावण्याच्या आरोपाखाली मुंबईस्थित एका मॉडेल तसंच धारावाहिक निर्मातीला अटक केलीय. 

सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थतत्व (AT) ग्रुपमध्ये गुंतवणुकदारांनी जमा केलेला फंड कोणत्याही सबळ कारणाशिवाय प्रीतीनं आपल्या कंपनी आणि नातेवाईकांच्या खात्यात जमा केला होता. ही गोष्ट समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

‘एटी’ ग्रुपच्या पैशांच्या देवाण – घेवाणीची चौकशी करणाऱ्या एजन्सीनं यापूर्वीही भाटिया हिला समन्स धाडले होते. ग्रुपचा प्रमुख प्रदीप सेठी यानं आपल्या सिरियल आणि सिनेमा निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे पैसे वापरले होते. 

तीन तास चौकशी झाल्यानंतर भाटिया हिनं पत्रकारांसमोर, आपला कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नसल्याचं म्हटलंय.

एटी ग्रुपनं मुंबई स्थित प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ओडिया सिने उद्योग, बॉलिवूड आणि सिरीयल्स बनवण्यासाठी पैसा वापरला होता... असा आरोप प्रीतीवर ठेवण्यात आलाय. यापूर्वीह सीबीआयनं ऑगस्ट महिन्यात भाटिया हिच्या घरावर धाड टाकली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.