कश्मीरमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा झेंडा

जम्मू आणि काश्मीरमध्ये इसिसचे झंडे फडकत असताना आता पाकिस्तानचा झेंडा चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर फडकल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अलिकडेच पाकिस्तानचे झेंडे श्रीनगरमध्ये फडकविण्यात आले होते.

Updated: Nov 25, 2015, 04:15 PM IST
कश्मीरमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर पाकचा झेंडा title=

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये इसिसचे झंडे फडकत असताना आता पाकिस्तानचा झेंडा चक्क मुख्यमंत्र्यांच्या घरावर फडकल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, अलिकडेच पाकिस्तानचे झेंडे श्रीनगरमध्ये फडकविण्यात आले होते.

जम्मू- कश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या घरावर पाकिस्तानी झेंडा फडकल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे घर असलेल्या बीजबेहरा भागातच हिजबुलचे तीन अतिरेकी चकमकीत ठार झाले होते. अतिरेक्यांचे मृत्यूवर मातम पाळत केलेल्या दफनविधीवेळी ही बाब उघडकीस आली. 

दरम्यान, पाकिस्तानी झेंडा घरावर लावलेला नसल्याचे पीडीपीच्या नेत्यांनी सांगितले. कश्मीर खोर्‍यात वारंवार चकमकी होत असताना मुख्यमंत्री मुफती मोहंमद सईद यांच्या वडिलोपार्जित घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचे समोर आले होते.

मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचे दिसून आले, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेमुळे कश्मीरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून संताप व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.