www.24taas.com, झी मीडिया, लडाख
चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा लडाख भागात घुसखोरी केलीय. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे 100 हून अधिक चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले. `हा भाग चीनचा असून, तो खाली करा`, असे बॅनर त्यांच्या हातात होते.
अलिकडच्या काळात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भारतीय हद्दीतील घुसखोरी वाढत चाललीय. गेल्या बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा लडाखमध्ये घुसखोरी केली, त्यावेळी भारतीय सैनिकांशी त्यांचा समोरासमोर संघर्षही झाला. नंतर ते पुन्हा आपल्या पोझिशनवर परतले, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
भारत आणि चीनच्या जवानांमध्ये दोन दिवस ‘फेस टू फेस’ संघर्ष रंगला. यावेळी चिनी सैनिकांनी सोबत आणलेलं एक वाहन भारतीय हद्दीत बंदही पडलं. दोन दिवसांच्या या धुमश्चक्रीनंतर 18 जुलैला पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली, अशी माहिती सैन्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
चीनच्या या ताज्या घुसखोरीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, विदेश सचिव आणि संरक्षण खात्याच्या सचिवांना माहिती देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.