नोबेल पुरस्कार विजेत्याला 100 कोटी देणार मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी राज्य सरकारकडून नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या वैज्ञानिकांना 100 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चंद्रबाबू नायडूंनी नोबेल पुरस्कारसोबत मिळणाऱ्या रक्कमेच्या 17 पट अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. नोबेल पुरस्कारासोबत सध्या 5.96 कोटी रुपये दिले जातात.

Updated: Jan 5, 2017, 12:00 PM IST
नोबेल पुरस्कार विजेत्याला 100 कोटी देणार मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी राज्य सरकारकडून नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या वैज्ञानिकांना 100 कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चंद्रबाबू नायडूंनी नोबेल पुरस्कारसोबत मिळणाऱ्या रक्कमेच्या 17 पट अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. नोबेल पुरस्कारासोबत सध्या 5.96 कोटी रुपये दिले जातात.
 
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंची ही ऑफर देशातील सर्वात मोठी ऑफर आहे. बक्षीस म्हणून दिली जाणारी ही रक्कम खूपच मोठी आहे. चंद्रबाबू नायडू यांनी दुसऱ्यांदा अशी मोठी घोषणा केली आहे. या आधी त्यांनी 10 कोटीचं बक्षीस जाहीर केलं होतं.