मुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.

Updated: Dec 8, 2016, 10:50 PM IST
 मुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर  title=

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.

 याबाबत जेटलींनी नाबार्डशी बोलणी केली असून उद्या रिझर्व्ह बँकेशीही चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून याचा लवकरच सकारात्मक विचार होईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. 
 
 तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही बैठकीमुळे समाधानी असल्याचं म्हटलंय. 

 मुख्यमंत्री बोलले पत्रकारांशी....

 
- अरूण जेटली यांनी नाबार्ड शी केली चर्चा
- जेटली उद्या आरबीआयशी करणार चर्चा
- सकारात्मक विचार होईल
- ग्रामीण लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय
- या बॅका आरबीआय नियमाखाली चालतात
- या बॅकात गैरव्यवहार होऊ शकणार नाही

- ५ हजार जुन्या नोटा जमा केल्या आहेत
- त्या स्वीकाराव्या अशी मागणी

धनंजय मुंडे बोलले पत्रकारांशी 

- आजच्या बैठकीमुळे आम्ही समाधानी आहोत
- लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे