मुंबई : सध्या देशभरातल्या सागरी सुरक्षेची झोप उडालीये... त्याला कारणीभूत ठरलंय एक हरवलेलं यंत्र...
२६ जुलै २०१२ या दिवशी कोस्टगार्डचं सेव्हन आईसलँड हे जहाज जयगडच्या किनाऱ्यावर बुडालं... यात असलेलं एक यंत्रही हरवलं... गेल्या ४ वर्षांत कोस्टगार्डची यंत्रणा हे यंत्र शोधू शकलेली नाही.
एका बोटीवरच्या हरवलेल्या यंत्रातून दररोज देशातल्या सगळ्या कोस्ट गार्डना आपत्कालिन स्थितीचा सिग्नल जातो आणि सर्व यंत्रणांची धावपळ उडते.
अजूनही या यंत्रावरचं आपत्कालीन सूचना देणारं बटन सुरू केल्यावर देशातल्या सर्व कोस्टगार्डना धोक्याचा इशारा जातो. मग यंत्रणांची धावाधाव होते. जयगडच्या किनाऱ्याकडे सैनिकांची तुकडी पाठवली जाते.
पण, थोड्या वेळानं हे यंत्र बंद होतं... गेल्या काही दिवसांपासून रोज हा प्रकार सुरू आहे. मात्र हरवलेलं हे यंत्र शोधून काढणं सुरक्षा यंत्रणांना अद्याप शक्य झालेलं नाही.