आग्रा: उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. सोनू मोहम्मद आणि शीलम कुमारी अशी या दोघांची नावं आहेत. यातला सोनू हा दहावीत तर शीलम ही नववीमध्ये आहे.
आग्र्याच्या कोतवाली सदर भागामधल्या एका घरामध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये या दोघांचे मृतदेह सापडले. या दोघांनीही प्रेमाला विरोध झाल्यामुळे घराचं दार लावून घेतलं आणि स्वत:ला पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सोनू आणि शीलम एकाच शाळेत शिकत होते, तसंच त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण या दोघांच्याही कुटुंबांना हे मान्य नव्हतं. अखेर शीलमच्या घरच्यांनी 9 मेला जबरदस्ती तिचं लग्न लावून दिलं.
या दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण या दोघांच्याही घरच्यांनी कोणतीही तक्रार नोंदवायला नकार दिला आहे. पोलिसांनी मात्र या दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.