अलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू

कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये. 

Updated: Jun 23, 2016, 10:14 AM IST
अलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू title=

अलाहाबाद : कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये. 

हे दाम्पत्य ईदनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडले होते. यावेळी कचरागाडीने या दाम्पत्याच्या बाईकला धडक दिली. या धडकीनंतर ते दोघेही गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर मात्र टेम्पोचा चालक पळून गेलाय. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. अद्याप कोणाला अटक कऱण्यात आलेली नाही.