राज ठाकरे हाजीर हो... दिल्ली कोर्टाचा समन्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने समन्स बजावले आहे. 2008 रेल्वे भरतीवेळी परप्रांतियांना झालेल्या मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 30, 2012, 06:34 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने समन्स बजावले आहे. 2008 रेल्वे भरतीवेळी परप्रांतियांना झालेल्या मारहाण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आला आहे.
28 सप्टेंबरला दिल्लीत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी बिहारच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र हा खटला बिहारबाहेर चालवावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली. त्यानंतर आता दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात हा खटला चालणार आहे.
2008 च्या ऑक्टोबर महिन्यात रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर बेदम मारहाण केली होती. या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करतानाच त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते.