नवी दिल्ली : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.
दाऊदला लवकरच भारत सरकार लवकरच पकडेल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये दाऊद नाही, असा कांगावा पाकिस्तान सरकार करत असतं, तरी तो तेथेच असल्याची माहिती हाती आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदने त्याचा खास माणूस जावेदशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. भारत, दुबईमधील व्यवहार जावेद पाहात आहे. दाऊद जावेदशिवाय तारिकच्याही संपर्कात असून, केवळ व्यवसायासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा करत आहे.
दरम्यान, १९९३ मध्ये झालेल्या बॉंबहल्ल्यातील आरोपी दाऊद हा सध्या पाकिस्तानात असल्याचे भारताने नमूद केले आहे. मात्र, इस्लामाबादने हे सत्य नसल्याचे म्हटले आहे, तर सईद हा सध्या पाकिस्तान मोकाट फिरत आहे, तर लख्वीची गेल्या महिन्यातच तुरुंगातून सुटका झाली आहे. या दोघांचा भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे.
दाऊद इब्राहिम, दहशतवादी हाफिज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.