काश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Updated: Aug 22, 2016, 10:52 AM IST
काश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट title=

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर राजकीय तोडगा काढण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत अशी या शिष्टमंडळाची प्रमुख मागणी आहे. याआधी शनिवारी या शिष्टमंडळानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली होती. शिष्टमंडाळचं नेतृत्व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला करत आहेत.