गृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलीय. यासंदर्भात केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीय. 

Updated: Feb 11, 2015, 07:54 PM IST
गृहमंत्र्यांना भेटले केजरीवाल, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी    title=

नवी दिल्ली: दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केलीय. यासंदर्भात केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीय. 

दिल्लीतल्या महत्वाच्या चार मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्रालयासोबत दिल्ली सरकार काम करणार असल्याची ग्वाही केजरीवालांनी दिलीय. केजरीवाल यांच्यासह आपचे नेते मनीष सिसोदिया यांनीही बैठकीला उपस्थिती लावली होती. 

यावेळी केजरीवालांनी राजनाथ सिंह यांना १४ फेब्रुवारीला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी केजरीवाल यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकया नायडूंचीही भेट घेतली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.