९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस

 देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Sep 21, 2015, 10:06 PM IST
९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस  title=

नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचे शाळेत जात असताना तीन तरूणांनी तिचे अपहरण केले. तिला एका कारमध्ये टाकून नजफगढ भाग घेऊन गेले आणि सुमारे दहा तास तिच्यावर गँगरेप करत होते. त्यानंतर दहा तासांनी तिला घराजवळ फेकून नराधम फरार झाले. 

मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले आहे, पण आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणी पोलीस उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचे प्रथमदर्शीनी दिसून आले आहे. 

फेसबूकवर शेअर करण्याची धमकी 

विद्यार्थीनीने दिलेल्या माहितीनुसार गँगरेपनंतर तीन तरूणांनी तिचा एमएमएस बनविला आणि याबद्दल कोणाला सांगितले तर फेसबूकवर टाकण्याची धमकी देली. विद्यार्थीनीने सांगितले की नराधमांनी १० तास अपहरण करून रेप केला. तिचा दारूही पाजली. यातील एका आरोपीला मुलगी पूर्वीपासून ओळख होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.