दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत हिंसाचाराला सुरूवात झालीय. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयावर सोमवारी हल्ला करण्यात आला.
27 वर्षांपूर्वी घटलेल्या घटनेचा राग व्यक्त करण्यासाठी वकिलांच्या संघटनेनं हा हल्ला केलाय.
1988 मध्ये किरण बेदी उत्तर दिल्लीच्या पोलीस उपायुक्त असताना वकिलांनी त्यांच्या ऑफिसबाहेर आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी वकिलांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले होते. त्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या वधवा आयोगानं आपल्या अहवालात बेदींवर ताशेरे ओढले होते.
याच घटनेच्या निषेधार्थ 27 वर्षांनी आज बेदींच्या राजकीय कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात काही भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.