www.24taas.com, राघोगड
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांच्या मते तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. तालिबान आणि रा.स्व.सं. एकसारखेच असल्याचं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.
राघोगड नगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले, “तालिबान आणि रा.स्व.संघ हे समान हेत. काण दोन्ही संघटना कट्टरवादी आहेत. दोन्हीही संघटना समाजाला १८ व्या शतकात घेऊन जात आहेत. केवळ असेच लोक महिलांच्या कपड्यांबद्दल नियाम बनवू शकतात. आणि त्यातून आपले गैरव्यवहार लपवू पाहातात.”
याशिवाय दिग्विजय सिंग म्हणाले, “एक दिवस असा येईल जेव्हा संघ महिलांच्या जीन्स, कंप्युटर आणि मोबाइल वापरावर बंदी घालण्याची मागणी करेल.” संघाच्या स्वयंसेवकांच्या गणवेषाबद्दल विधान करत दिग्गीराजा म्हणाले, “जर संघाला भारतीय संस्कृतीचा पुळका असेल, तर त्यांचा गणवेष शर्ट आणि हाफ पँट का असतो? ते लोक भारतीय पोषाख असणारं धोतर का नाही नेसत?”