पत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत

पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला. 

Updated: May 25, 2016, 04:10 PM IST
पत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत title=

लखनऊ : पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला. 

 काही कौटुंबिक वादातून राम प्रसादची पत्नी त्याला सोडून निघून गेली. त्यामुळे निराश झालेला राम प्रसाद थेट वीज खांबावर चढला आणि उत्तर प्रदेशातील तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत केला. जवळपास सहातास वीजपुरवठा खंडीत होता. राम प्रसादने सोमवारी सकाळी फिरोझाबाद जिल्ह्यात हा प्रकार केल्याचे पुढे आलेय.
 
राम प्रासाद सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास असफाबाद गावातील १.३५ लाख व्होल्ट क्षमतेच्या वीजेच्या खांबावर चढला. तो पोलिसांना पत्नीला शोधून आणण्यास सांगत होता. तुम्ही माझ्या पत्नीला शोधून आणा अन्यथा खांबावरुन उडी मारुन मरण पत्करेन, अशी धमकी तो देत होता. पोलिसांनी त्याला पत्नीला शोधून काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११.३० च्या सुमारास तो खाली उतरला.  
 
राम प्रसाद वीज खांबावर चढलेला असताना त्याला शॉक लागू नये यासाठी विद्युत विभागाला त्या पोलमधून सुरु असलेला वीज पुरवठा बंद करावा लागला. रामप्रसादला चार मुले असून कौटुंबिक वादातून त्याची पत्नी त्याला सोडून गेली. खाली उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली.