डॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ

डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे. 

Updated: Jul 23, 2014, 08:56 PM IST
डॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ title=

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे. 

शेअर बाजारातील उलाढाली बुधवारी सकाळी सुरू झाल्यानंतर विदेश भांडवलाचा ओघ कायम राहिला. तसेच, बँका आणि निर्यातदारांकडून करण्यात येणारी डॉलरची विक्री वाढली. त्यामुळे रुपयाच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

याशिवाय, देशांतर्गत समभाग विक्री बाजारातील घडामोडींमुळेही रुपयाला फायदा झाला. दरम्यान, इतर विदेशी चलनांच्या तुलनेत मात्र डॉलरची किंमत वाढली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.