व्हिडिओ: पाहा तुमच्या मुलांसोबत तर असं काही होत नाही

कोलकात्यामध्ये एका शिक्षिकेनं अवघ्या 3 वर्षाच्या मुलाला मारून मारून रक्तबंबाळ केल्याची घटना घडलीये. या मुलाच्या घरातल्या सीसीटीव्हीमध्ये ही भयानक दृष्य कैद झालीयेत. पूजा सिंग असं या शिक्षिकेचं नाव आहे. 

Updated: Jul 23, 2014, 06:50 PM IST
 व्हिडिओ: पाहा तुमच्या मुलांसोबत तर असं काही होत नाही title=

कोलकाता: कोलकात्यामध्ये एका शिक्षिकेनं अवघ्या 3 वर्षाच्या मुलाला मारून मारून रक्तबंबाळ केल्याची घटना घडलीये. या मुलाच्या घरातल्या सीसीटीव्हीमध्ये ही भयानक दृष्य कैद झालीयेत. पूजा सिंग असं या शिक्षिकेचं नाव आहे. 

तीन दिवसांपूर्वीच तिला मुलाच्या शिकवणीला ठेवलं होतं. काहीतरी कारणानं पूजानं या मुलाला इतकं मारलं की त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. या घटनेनंतर ती पळून गेलीये. ती या घराशिवाय इतरत्रही शिकवत असल्याचं समजलंय. 

दरम्यान, आंध्र प्रदेशातील काकीनाडा इथं एका अंधशाळेमध्ये मुख्याध्यापक आणि एका शिक्षकानं मुलांना अशीच मारहाण केली होती. दोन दिवसांपूर्वी उजेडात आलेल्या या घटनेनंतर बालहक्क आयोगानं कारवाईचे आदेश आंध्रप्रदेश पोलिसांना दिले होते. ही घटना धसास लागते न लागते तोच आता कोलकात्याचा हा प्रकारही समोर आलाय. 

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनांची दखल घेतली जाईलच. पण आपल्या मुलांसोबत असं काही घडत नाहीये ना, यासाठी पालकांनी जागरूक रहायला हवं.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ: 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.