सोने शोधू नका, काळा पैसा आणाः मोदी

उन्नावच्या गोल्डरशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2013, 06:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
उन्नावच्या गोल्डरशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
स्विस बँकांमध्ये ठेवलेला काळा पैसा सरकारनं परत आणला, तर खजिना शोधायची गरज पडणार नाही, असं ते म्हणाले. एका साधुला स्वप्न काय पडलं आणि सरकार सोनं शोधायला निघालं... या प्रकारामुळे सगळं जग आपली खिल्ली उडवतंय, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर तोंडसूख घेतलंय.
मात्र मोदी गृहपाठ न करता बोलत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेस नेत्या रेणूका चौधरी यांनी दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.