नेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर

नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं. 

Updated: May 13, 2015, 09:57 AM IST
नेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर title=

नवी दिल्ली : नेपाळमध्ये भूकंपानं पुन्हा कहर केलाय. मंगळवारी झालेल्या भूकंपात नेपाळमध्ये ५० जणांचा बळी गेलाय. तर एक हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधल्या कोडारीत असून याठिकाणी मोठे भूस्खलनही झालंय. चौतारा भागात सर्वात जास्त नुकसान झालंय. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या भूकंपानं नेपाळ उध्वस्त झाला होता. त्यात आता पुन्हा भूकंपाच्या संकटानं नेपाळला ग्रासलंय. 

नेपाळपाठोपाठ उत्तर भारताला पुन्हा भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिल्लीसह बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. यात १७ जणांचा बळी गेलाय. मात्र सर्वात जास्त हादरा बिहारला बसलाय. बिहारमध्ये १६ जणांचा मृत्यू झालाय. तर ३९ जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशात एक जणाचा मृत्यू झालाय. उत्तर भारतात ४५ मिनिटांत दोन भूकंपाचे धक्के बसले. यामुळं नागरिकांमध्ये  काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. भूकंपाचे केंद्र नेपाळमधील कोडारीत असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.४ एवढी होती. दिल्लीतही या भूकंपाचे हादरे बसले. सतर्कता म्हणून दिल्लीची मेट्रो काही काळ थांबवण्यात आली होती. 

भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यात 50 जण ठार

नेपाळमध्ये आज बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यात ५० जण ठार झाले, तर ११०० जण जखमी झाल्याची माहिती नेपाळच्या गृहमंत्रालयाने दिली आहे. तर भारतामध्येही भूकंपामुळे सहा जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.४ इतकी मोजली गेलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपाचा धक्का पाकिस्तान आणि बांग्लादेशातही जाणवलाय. 

उत्तर प्रदेशातील सांभाल जिल्ह्यात भूकंपाचा धक्का बसल्यानंतर घर अंगावर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजतंय. 

अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांतील उंच इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. 

दिल्ली एनसीआरसहीत कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, पश्चिम बंगाल, जयपूर, लखनौ, राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेशातही भूकंपाचा धक्का तीव्र धक्का जाणवलाय. 

जवळपास एक मिनिटापेक्षाही हा भूकंपाचा तीव्र धक्का जाणवत होता. त्यानंतर तातडीनं दिल्लीतली मेट्रो सेवा थांबविली गेलीय. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला अलर्टवर ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.