उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह, राजस्थान, श्रीनगर,  शिमला, श्रीनगर, चंदीगडला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली आहे.

Updated: Oct 26, 2015, 10:14 PM IST
उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला title=

नवी दिल्ली: उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह, राजस्थान, श्रीनगर,  शिमला, श्रीनगर, चंदीगडला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली आहे.

 

 

अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. भूकंपाच्या धक्क्यांनंतर दिल्लीतील मेट्रो सेवा थांबवण्यात आलीय. तर श्रीनगरमधील फोनसेवा भूकंपाच्या झटक्यानं खंडित झालीय. 

दरम्यान, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागानुसार भूकंपाचा झटका  ८.१ रिश्टर स्केल तर यूएसजीएसनुसार भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल असल्याचं जीओ न्यूजनं सांगितलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.