रायपूर: छत्तीसगडमधील बिलासपूर इथल्या एका रुग्णालयात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू झाला असून ३२ महिलांची प्रकृती गंभीर आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं सात महिलांना जीव गमवावा लागला आहे.
बिलासपूर इथल्या रुग्णालयात शनिवारी सरकारी नसबंदी शिबीरादरम्यान ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यापैकी काही जणींना ताप आला तर काहींना वेदना होऊ लागल्या. त्या महिलांची प्रकृती बिघतच गेली आणि सोमवारी ७ जणींचा मृत्यू झाला. आणखी ३२ महिलांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी तसंच मृत महिलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.