जम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी

पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.  २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत. 

Updated: Oct 10, 2016, 07:31 PM IST
जम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी title=

जम्मू-काश्मीर : पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.  २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत. 

पंपोरच्या एका इमारतीत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. ऐंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इंस्टीट्यूटची ही इमारत आहे जी झेलम नदीच्या जवळ आहे. नदीच्या मार्गेच या दहशतवाद्यांनी घुसखोरी करत इमारतीत प्रवेश केला. सकाळी दहशतवाद्यांची घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर जवान आणि पोलिसांनी इमारतीला घेरलं.

सकाळी साडे पाच वाजता दहशतवाद्यांनी इमारतीच्या एका भागात आग लावली. अग्निशमन दलाला तेथे पाचारण करण्यात आलं. आग विझवण्यासाठी सुरुवात होताच दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर इमारतीच्या सर्व रस्त्यांना बंद करण्यात आलं. जवानांनी आणि पोलिसांनी ५ व्या आणि ६ व्या माळ्यावर या दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर पॅरा कमांडोच्या जवानांनी हा मोर्चा सांभाळला. इमारतीमध्ये लोकांना बंधक करण्याच्या तयारीत हे दहशतवादी होचते पण त्यांची ही योजना अपयशी ठरली.