१५ ऑगस्टपासून पीएफ करा `ऑनलाईन ट्रान्सफर`

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) १५ ऑगस्टपासून पीएफ खात्याचं ऑनलाईन ट्रान्सफर सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या सेवेचा जवळजवळ १३ लाख चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 29, 2013, 12:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) १५ ऑगस्टपासून पीएफ खात्याचं ऑनलाईन ट्रान्सफर सुविधा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या सेवेचा जवळजवळ १३ लाख चाकरमान्यांचा फायदा होणार आहे.
नोकरी बदलल्यानंतर नवीन कंपनीत ईपीएफ खाते हस्तांतर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतं होतं. पण, येत्या १५ ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांचे ईपीएफ खाते ऑनलाईन हस्तांतरित करण्याची सुविधा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे (इपीएफओ) सुरू होणार आहे. यामुळे याचा दरवर्षी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

`ईपीएफओ`नं कर्मचाऱ्यांचं डिजिटल स्वाक्षरीची नोंद सुरू केलीय. ऑनलाईन सुविधेसाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट होती. येत्या दोन आठवड्यांत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची नोंद करू शकेल. त्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येईल. ही योजना जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मोहीमही उघडण्यात येणार आहे. या ऑनलाईन ट्रान्सफर सुविधेमुळे कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार आहे. केवळ तीन दिवसांत तुमचं खातं ऑनलाईन ट्रान्सफर होऊ शकेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.