नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात आता पहिल्यांदाच महिला पायलट लढाऊ विमानांचे सारथ्य करणार आहेत. १८ जून २०१६ रोजी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला वैमानिक या विमानांचे सारथ्य करतील, अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी दिली आहे.
सर्वच क्षेत्रांत महिला यशाची भरारी घेत असताना संरक्षण क्षेत्रात तरी त्या कशा मागे राहू शकतात? भारतीय हवाई दलात महिला पायलटची नियुक्ती केली जावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष होत होती. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी काहीच दिवसांपूर्वी याबाबतची घोषणा केली होती.
सध्या तीन महिला पायलट यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व ट्रेनिंग घेतायत. आत्तापर्यंत त्यांचे बरेचसे ट्रेनिंग पूर्णही झाले आहे. त्यामुळे आता भारतीय महिला या क्षेत्रातही गगनभरारी घेतील, यात शंका नाही.
पाकिस्तानसह जगातील अनेक देशांत याआधीच अनेक महिला लढाऊ विमांनाचे सारथ्य करतायत.