फेसबुकवर प्रेम, लग्न आणि ४८ तासात घटस्फोटही

एका प्रेमी युगलांचे फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. एका आठवड्यात लग्नही झालं आणि ४८ तासात घटस्फोटही झाला.

Updated: Apr 30, 2013, 05:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीकानेर
एका प्रेमी युगलांचे फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. एका आठवड्यात लग्नही झालं आणि ४८ तासात घटस्फोटही झाला.
या जोडप्याने गेल्या शुक्रवारी श्रीडूंगरगढ भागातील एका देवळात लग्न केले. त्यानंतर शनिवारी ते दोघे फिरायला गेले असता त्यांच भांडण झालं आणि रविवारी त्यांनी श्रीडूंगरगढ पोलीस ठाण्यात सामजस्यातून तोडगा काढत ते घटस्फोट घेण्यास तयार झाले.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार बीकानेरची रहिवासी असलेली युवती तसेच ३० वर्षीय शंकरलाल ने फेसबुकवरील आपल्या मैत्रीनंतर परिवाराच्या संमतीने लग्न केले. त्या युवतीचा याआधी घटस्फोट झाला होता तर शंकरच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता अशी माहिती वादाच्या दरम्यान पुढे आली.