गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी होणार सार्वजनिक.

केंद्रीय माहिती आयोगाने महात्मा गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी सार्वजनिक करण्याची सूचना केली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ओडिसामधील हेमंत पांडा यांनी गांधीजींच्या हत्येची प्राथमिक आरोपपत्रासह इतर माहिती मागितली होती. यात गांधीजींचे पोस्टमार्टेम झाले होते का असा प्रश्नही विचारण्यात आलाय. 

Updated: Jun 28, 2015, 08:28 PM IST
गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी होणार सार्वजनिक. title=

दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने महात्मा गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी सार्वजनिक करण्याची सूचना केली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ओडिसामधील हेमंत पांडा यांनी गांधीजींच्या हत्येची प्राथमिक आरोपपत्रासह इतर माहिती मागितली होती. यात गांधीजींचे पोस्टमार्टेम झाले होते का असा प्रश्नही विचारण्यात आलाय. 

मंत्रालयाने हा अर्ज भारतीय अभिलेखागार, दर्शन समिती आणि गांधी स्मृतीच्या संचालकांकडे पाठवलाय. राष्ट्रीय अभिलेखागाराकडून पांडा यांना सांगण्यात आलंय की, पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट १९९३ आणि पब्लिक रेकार्ड रूल्स १९९७ मधील तरतूदींनूसार ठेवलेली माहिती त्यांच्या अखत्यारीत येते. दर्शन समितीच्या माहितीनुसार गांधीजींच्या परीवाराच्या इच्छेनुसार त्यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले नव्हते.  ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली होती पण त्याच्या प्राथमिक आरोपपत्राबद्दल कोणती माहिती उपलब्ध नाही.

या अर्जावरील आदेशावर ३० दिवसात कारवाई करणे आवश्यक आहे. 

गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेने ते प्रार्थनेला जाताना केली होती.

लाल किल्ल्यातील विशेष न्यायालयाने  नथुराम आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा दिली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.