गँगरेपमध्ये मुलीने जबाब बदलला, आमदाराचा मुलगा सुटला

बसपा आमदारांचे पुत्र आणि दोन युवकांवर सामूहिक बलात्काराच्या केसमध्ये १७ वर्षीय पीडित मुलीने आपलं जबाब फिरवला, आणि पलटी मारली आहे.

Updated: Nov 14, 2012, 04:16 PM IST

www.24taas.com, मुजफ्फरनगर
बसपा आमदारांचे पुत्र आणि दोन युवकांवर सामूहिक बलात्काराच्या केसमध्ये १७ वर्षीय पीडित मुलीने आपलं जबाब फिरवला, आणि पलटी मारली आहे. पोलिसांनी वैद्यकिय चाचणीनंतर पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला होता. आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर मुलीने जबाब फिरवला, असा काही प्रकार झालाच नाही. आणि त्याच्यावरील आरोपांना नकार दिला.
पी़डित मुलीच्या तक्रारीनंतर बसपा आमदार मौलाना जमील अहमद यांचा पुत्र नुमान आणि त्यांचे नातेवाईक आणि एक आणि अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
प्राथमिक माहितीनुसार तिघांनी बसरिया गावातून मुलीचं अपहरण करून जवळील जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.