निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशात गॅंगरेप, मुलीचे मूत्रपिंड निकामी

दिल्लीतील निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बदायुमध्ये गॅंगरेपची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या नराधमानी तिच्या अंगावर हल्ला करत तिच्या मूत्रपिंडाचे नुकसान केले. यात मूत्रपिंड निकामी झाले.

Updated: Jul 1, 2015, 04:59 PM IST
निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशात गॅंगरेप, मुलीचे मूत्रपिंड निकामी title=

लखनऊ : दिल्लीतील निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बदायुमध्ये गॅंगरेपची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या नराधमानी तिच्या अंगावर हल्ला करत तिच्या मूत्रपिंडाचे नुकसान केले. यात मूत्रपिंड निकामी झाले.

ही घटना २३ जूनची असून मुलीच्या कुटुंबीयांनी पाच दिवसांनी रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. यात मदत करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली.

मुलीच्या कुटुंबीयानी सांगितले की, पिडीत मुलगी डिप्रेशनची शिकार झाली. ती लखनऊ येथील आपल्या बहिणीकडे गेले त्यावेळी आपल्यावरील भयंकर प्रसंग तिने सांगितला.

पिडीत मुलगी एका पॉश वसहतीतील दुकानात जात होती. यावेळी एका मुलाने दोन मुलांच्या मदतीने मुलीला जबरदस्तीने बाईकवर बसविले. त्यानंतर दोन किलोमीटर ऊसाच्या शेतात नेले. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडून आरोपी पळालेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या शेतकऱ्याने मुलीला तिच्या घरी सोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.