...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात!

जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.

Updated: Jul 1, 2015, 04:22 PM IST
...जेव्हा मंत्र्यांनी घातला महिला डॉक्टरच्या कॉलरला हात! title=

जम्मू : जम्मू - काश्मीरचे मंत्री चौधरी लाल सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत मंत्री महोदयांचा हात एका महिला डॉक्टरच्या शर्टाच्या कॉलरवर आहेत.

चौधरी लाल सिंह हे भाजपचे नेते आहेत. जम्मू-काश्मीरचे ते आरोग्य मंत्री आहेत. नुकताच त्यांनी लखनपूरच्या सरकारी हॉस्पीटलमध्ये अमरनाथ यात्रेपूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला. याचवेळचा हा फोटो आहे. 

महिला डॉक्टरच्या शर्टाची कॉलर योग्य नव्हती म्हणून मग मंत्री महोदयांनी स्वत:च्या हातांनी डॉक्टरची कॉलर पकडली आणि सरळ केली. उपस्थितांच्या माहितीनुसार, यावेळी या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. 

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका महिला डॉक्टरनं चौधरी लाल सिंह यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला होता. लाल सिंह यांनी या महिला डॉक्टरला एप्रन परिधान करण्यासाठी फटकारलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.