दिल्ली पुन्हा हादरली

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीये. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत शनिवारी घडली. गेल्या दोन दिवसांतील बलात्काराची ही दुसरी घटना आहे. दक्षिण दिल्लीतील टिगरी भागात ही घटना घडली. 

Updated: Dec 13, 2015, 11:54 AM IST
दिल्ली पुन्हा हादरली title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीये. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत शनिवारी घडली. गेल्या दोन दिवसांतील बलात्काराची ही दुसरी घटना आहे. दक्षिण दिल्लीतील टिगरी भागात ही घटना घडली. 

पहिलीच्या वर्गात शिकणारी पिडीत मुलगी शनिवारी संध्याकाळी जवळच्या पार्कात खेळत होती. त्यावेळी तीन नराधमांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बाजूच्या नागरिकांनी पिडीत मुलीला पाहिल्यानंतर तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असून पिडीत मुलीची प्रकृती गंभीर आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एकाला अटक कऱण्यात आली असून दोघेजण फरार आहेत. गेल्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. यामुळे दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.