जबरी चुंबन पडले महाग, मुलीने तोडली जीभ

जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 6, 2014, 11:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये
जबरदस्तीने चुंबन घेणाऱ्या मुलाला अद्दल घडावी म्हणून मुलीनं चक्क आपल्या दातांनी त्यामुलाच्या जीभेचा तुकडाच पाडला. तिनं आरोप केला आहे की, त्या युवकाने तिची छेड काढली, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.
कमलानगर विभागात मंगळावारी कमलेश शर्मा नावाच्या एका मुलाने १८ वर्षाच्या एका मुलीची छेड काढली आणि तिला चुंबनची जबरदस्ती केली. दबावात तिने त्याचे चुंबन घेतले पण ते असे काही चुंबन होते की त्याने त्याला जन्माची अद्दल घडली. मुलीनं चुंबन करताना त्याची जीभ दातांमध्ये घट्ट पकडली आणि जीभेचा तुकडा पडेपर्यंत सोडली नाही, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
त्या मुलाला आता जन्माची अद्दल घडली आहे. आता तो कोणालाही जबरदस्तीने काय प्रेमानेही चुंबन करू शकणार नाही, असे त्या मुलीने सांगितले.
कमलेश अनेक दिवसांपासून त्या मुलीची छेड काढत होता. पोलिसांनी मुलीची तक्रार ऐकून घेतली आणि कमलेश विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी कमलेशने आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले असून त्या मुलीशी आपली आधीपासून चांगली ओळख आहे. मुलीला १८ हजार रुपये उधार दिले होते. जेव्हा मी तिच्या घरी गेलो तेव्हा या मुलीने आपल्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून माझे चुंबन घेतले आणि माझी जीभ दातांत पकडली. जेव्हा मी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी जीभ तुटली, असे त्याने पोलिसांना सांगितले. सध्या कमलेश पोलीसांच्या ताब्यात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.