मुंबई : प्रवाशांना अत्यंत कमी दरात विमान सेवा उपलब्ध करून देणाऱ्या 'गो एअर' या विमान कंपनीनं शनिवारी आपल्या ग्राहकांसाठी सीमित अवधीसाठी सवलतीच्या दरात तीन योजना उपलब्ध करून दिल्यात.
यानुसार, येत्या नव्या वर्षात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत एका बाजुच्या यात्रेसाठी कमीत कमी ६९१ रुपयांत (कर अतिरिक्त) तुम्हाला प्रवास करता येईल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ख्रिसमस स्पेशल, गो - एक्सप्लोर आणि हॅप्पी ट्युसडेजचं आपलं लक्ष्य आहे. यामध्ये, विशेष करून सुट्ट्यांच्या काळात कमीत कमी दरात प्रवाशांना विमान प्रवास करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
गो एअरच्या एका जाहिरातीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'ख्रिसमस स्पेशल'मध्ये २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरपर्यंत बुकिंग उपलब्ध आहे... आणि प्रत्येक २५ व्या गो - एअर प्रवाशाला मोफत तिकीटही मिळवण्याची संधी मिळेल. हे प्रवासी १ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत प्रवास करू शकतात.
'गो एक्सप्लोर' योजनेत १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१६ साठी तिकीट मिळतील. यासाठी, तिकीटांची सुरुवात ६९१ रुपयांपासून होईल. याचा फायदा घेण्यासाठी ग्राहक २१-२४ नोव्हेंबर पर्यंत आपलं तिकीट बुक करू शकतात.
तर, 'हॅपी ट्युसडेज' योजनेंतर्गत प्रवाशांना केवळ मंगळवारी प्रवास करण्याची अनुमती असेल. २४ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१५ पर्यंत बुक करण्यात आलेल्या तिकीटांना २० टक्के सवलत मिळेल. चार आठवड्यांची बुकिंग १४ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत उपलब्ध असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.