नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १७५ रुपयांची घट होत ते प्रतितोळा २९,५५० रुपयांवर आलेत. चांदीचे दरही तब्बल ३४० रुपयांनी कमी होत ते प्रतिकिलो ४१,५०० रुपयांवर आलेत.
बुधवारी ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात १७५ रुपयांची घसरण होत ते अनुक्रमे २९,५५० आणि २९,४०० रुपयांवर आलेत. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली.