मुंबई : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठ्या घसरणीची नोंद झालीय. सेन्सेक्स 54.53 अंकांनी घसरून 27,265.32 वर तर निफ्टी 20.95 अंकांनी घसरूण 81,152.95 वर बंद झाला.
सोबतच, सोन्याच्या भावदेखील 150 रुपयांनी घसरले. त्यामुळे, गेल्या तीन महिन्यांतील सगळ्यात निम्न स्तरावर म्हणजे 27,600 रुपये प्रति दहा ग्रामवर सोनं पोहचलं. तर रुपयामध्ये 31 पैशांची घसरण होऊन 60.60 रुपये प्रति डॉलरवर बंद झालं. अमेरिकी व्याज दरांत लवकर वाढ झाल्यानं निर्माण झालेल्या चिंतेमुळे रुपयानं मंगळवारी गेल्या सहा आठवड्यांतील निचांक गाठला.
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे भाव 150 रुपयांनी घसरले आमि सोनं 27,600 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहचलं. तर, चांदीचे भाव 175 रुपयांनी घसरून 41,900 रुपये प्रति किलोवर पोहचले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.