मोदींच्या त्या सूटसाठी 4 कोटी 31 हजार 311 रुपयांची बोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

Updated: Aug 20, 2016, 12:11 PM IST
मोदींच्या त्या सूटसाठी 4 कोटी 31 हजार 311 रुपयांची बोली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या सूटला विक्रमी बोली मिळाली आहे. ही बोली तब्बल 4 कोटी 31 31 हजार 311 रुपयांची आहे. या अति महागड्या बोलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये घेतली गेली आहे. 

हिरे व्यापारी लालजी पटेल यांनी हा सूट विकत घेतला आहे. लिलावातून मिळालेली ही रक्कम गंगा स्वच्छता अभियानासाठी वापरण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतामध्ये आले असताना त्यांच्याबरोबर झालेल्या भेटीवेळी मोदींनी हा सूट घातला होता. 

मोदींनी घातलेल्या या सूटवर टीकाही करण्यात आली होती. या सूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असं लिहिण्यात आलं होतं.