नवी दिल्ली : सोन्याच्या दरात वारंवार होत असलेली घसरण अखेर गुरुवारी थांबली. दिल्लीच्या सराफा बाजापात सोन्याच्या दरात आज तब्बल ४५० रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा २९,१०० वर पोहोचले.
सोन्याच्या दरात आज तेजी पाहायला मिळाली. स्थानिक बाजारातही सोन्याची खरेदीही वाढल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळाला.
चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळाली. चांदीचे दर १०५० रुपयांनी वाढून ते ४१,३५० रुपयांवर बंद झाले.
दिल्लीमध्ये ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने प्रतितोळा २९,१०० आणि २८,९५० रुपयांवर बंद झाले.