सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर

सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

Updated: Feb 10, 2017, 04:11 PM IST
सोने तीन आठवड्याच्या नीचांकावर title=

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ४०० रुपयांनी घसरुन २९,५०० रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन आठवड्यांतील सोन्याने गाठलेला हा नीचांक आहे. 

सोन्यासह चांदीचीही झळाळीही फिकी झालेली पाहायला मिळाली. चांदीच्या दरातही प्रति किलो ४९० रुपयांची घसरण होत ते ४२,२५० रुपयांवर पोहोचले. 

राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे २९,५०० आणि २९,३५० इतके होते. याआधी १६ जानेवारीला सोन्याच्या दरात इतकी मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्या दिवशी सोन्याचे दर २९,५००वर पोहोचले होते.